सावंतवाडी ता.०२-:कलंबिस्त येथील एका कॉलेज युवकाचे दुःखद निधन झाले असून, गेले काही दिवस तो आजारी असल्याने त्याच्यावर गोवा येथे उपचार सुरू होते. अखेर आज उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. भिकाजी पास्ते ( वय १७) असे त्या मुलाचे नाव असून, येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल मध्ये तो इयत्ता १२ वी कॉमर्स मध्ये शिक्षण घेत होता. अत्यंत हुशार, प्रामाणिक असल्याने सर्वच शिक्षकाचा तो आवडता विद्यार्थी होता. त्याच्या आकस्मित जाण्याने त्याच्या गावातून तसेच शाळेतील शिक्षकाकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कलंबिस्त येथील कॉलेज युवकाचे आकस्मित निधन…
