मळेवाड येथे ४ डिसेंबर रोजी निमंत्रितांची भजन स्पर्धा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना मळेवाड-कोंडुरे शाखेच्यावतीने आयोजन

*⚡सावंतवाडी ता.०२-: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना मळेवाड-कोंडुरे शाखेच्यावतीने ४ डिसेंबर रोजी भव्य निमंत्रित भजन स्पर्धा २०२१ चे आयोजन मळेवाड जकात नाका येथे करण्यात आले आहे.

या अगोदर १७ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात।आले होते. मात्र अवकाळी पावसामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही स्पर्धा ४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा सायंकाळी ५ वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेत श्री देव महापुरुष भजन मंडळ, पिंगुळी (बुवा प्रसाद आंबडोस्कर), स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ कलंबिस्त (बुवा संतोष धर्णे), गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ वेंगुर्ला- वडखोल (बुवा रुपेंद्र परब), श्री निवजेश्र्वर प्रासादिक भजन मंडळ , निवजे – कुडाळ (बुवा महेंद्र पिंगुळकर), श्री सनामदेव प्रासादिक भजन मंडळ सांगेली (बुवा खेमराज सनाम), रामकृष्ण हरी भजन मंडळ सेवा संघ, पाट पंचक्रोशी।(बुवा आशीष सडेकर), स्वरगंधार प्रासादिक भजन मंडळ निरवडे (बुवा प्रसाद कांबळी), स्वराभिषेक भजन मंडळ मणेरी (बुवा गितेश कांबळी) आदी भजन मंडळांना स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ७ हजार रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक ५ हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिक ३ हजार रुपये व चषक आदी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच इतर वैयक्तिक पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत. तरी सर्व भजन प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळेवाड -कोंडुरे शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page