गाबित समाजातील मुलांना वह्या व दप्तर वाटप

*⚡मालवण ता.०१-:* मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबई या संस्थेला १०४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने देवबाग येथील ५ वी ते १० वी पर्यंतच्या मुलांना वह्या वाटप करण्यात आले. तर गरीब हुशार पाच मुलांना दप्तर देण्यात आली. यावेळी मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष श्री.सुरेश बापर्डेकर यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले. प्रत्येक वर्षी संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. यावेळी १० वी, १२ वी गुणवंत विद्यार्थी व पदवीधर यांचा यथोचित सन्मान होतो. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून भविष्यात चांगले करियर निवडून प्रगती साधावी आणि आपल्या गावाचे व समाजाचे नाव उज्ज्वल करावे असे बापर्डेकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला देवबाग ग्रामपंचायत शिपाई दादा दातोस्कर, संस्था उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर, समाजसेवक तुळशीदास कासवकर, ग्रामस्थ पपू कूर्ले आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. देवबागसह यापूर्वी कोळंबी ते सर्जेकोट येथील मुलांनाही संस्थेतर्फे वह्या, दप्तर वाटप करण्यात आले.

You cannot copy content of this page