श्री सातेरी मायगवस देवीच्या नूतन मंदिराची १ डिसेंबर रोजी वास्तुशांती कार्यक्रम…

*दोडामार्ग / सुमित दळवी* हेवाळे वासीय आणि श्री सातेरी मायगवसचे भाविक यांनी देवतनच्या नूतन मंदिरांचे पाहिलेलं स्वप्न पूर्ण झाले असून हेवाळे गावच्या ग्रामदेवता श्री सातेरी मायगवस देवतांच्या देवराईतील नूतन मंदिरांचा वास्तुशांती कार्यक्रम बुधवारी १ डिसेंबरला संपन्न होणार आहे. सकाळी ९ वाजल्यापसुन धार्मिक कार्यक्रमांना सुरवात होणार आहे.           या नूतन मंदिर वास्तुशांती कार्यक्रमास ग्रामवासीय व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ व मित्रमंडळी व माहेरवाशिणी तसेच भाविक यांनी  आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन हेवाळे ग्रामस्थ यांनी केले आहे. तसेच यावर्षी देवदीपावळी कार्यक्रम सुद्धा येत्या ५ डिसेंबरला आयोजन करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page