संजीवनी हाॅस्पीटल येथे रोटरी क्लबमार्फत महिलांसाठी कॅन्सरपूर्व तपासणी शिबीर

*⚡कणकवली ता.२९-:* कणकवली येथील संजीवनी हाॅस्पीटल येथे रोटरी क्लब मार्फत महिलांसाठी कॅन्सरपूर्व तपासणी शिबीर मंगळवार 30 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 ते 11.00 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. वय वर्षे 40 व त्यापुढील वयोगटातील महिलांची शुगर, बी.पी.व कॅन्सरपूर्व तपासणी मोफत करण्यात येणार आहे. या संदर्भात ज्या महिलांना मॅमोग्राफी करण्याची आवश्यकता असेल त्यांची मॅमोग्राफी एस.एस.पी. एम.पडवे येथे 1, 2 व 3 डिसेंबर 2021 रोजी मोफत करण्यात येणार आहे. महिलांची तपासणी –डाॅ. प्रिती पावसकर व डाॅ. हेमा तायशेटे करणार आहेत.पडवे येथे जाणे – येणेसाठी मोफत वाहन व्यवस्था संजीवनी हाॅस्पीटल येथून वरील तीनही दिवशी सकाळी 8.30 वा. उपलब्ध आहे. परत येण्याची वेळ सायंकाळी 4.30 अशी आहे. त्यामुळे मॅमोग्राफीसाठी ज्याना जावे लागेल त्यानी दुपारच्या जेवणाचा डबा सोबत घ्यावा. या शिबिराचा लाभ मनात कोणतीही भिती अगर संकोच न बाळगता महिला वर्गाने घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page