कलमठ विज प्रश्नी संदिप मेस्त्री यांनी घेतली कार्यकारी अभिययंत्यांची भेट
*⚡कणकवली ता.२६-:* कलमठ गावातील वारंवार खडित होणारा विजपूरवठा, वायरमन, विभाग अभियंता ग्राहकांचे फोन न उचलणे, नादुरुस्त ट्रांसफार्मर यावर कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्याशी भाजपा युवामोर्चा सरचिटणीस संदिप मेस्त्री यांनी चर्चा केली.सेवा सुधारा अन्यथा मोठ आंदोलन करण्याचा इशारा देतानाच नवीन ट्रांसफार्मर व जळलेल्या घरगुती उपकरणांचे पंचनामे करा तसेच कलमठ गाव अर्बनला जोड़ा अशी मागणी यावेळी संदीप मेस्त्री यानी केली. कलमठ गावातील नादुरुस्त ट्रांसफार्मर , कमी जास्त दाबाने विजपूवठा होत असल्याने कलमठ बौद्धवाड़ी, सुतारवाड़ी व इतर भागांमध्ये टीवी, पंखे, मोडेम व इतर घरगुती विज उपकरणें जळून नादुरुस्त झाल्याकडे संदीप मेस्त्री यांनी लक्ष वेधले. पंचनामे करा, नवीन ट्रांसफार्मर बसवा मगच विज बिल वसूलीसाठी कलमठमध्ये या अन्यथा कलमठ वासियांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे मेस्त्री यांनी सांगितले. कलमठ गावातील वारंवार खंडित होणाऱ्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघा कलमठ गावात ४००० विज ग्राहक असताना कलमठ ग्रामीणमध्ये का? शहर आणि ग्रामीण यांच्यात यूनिट दर मध्ये फरक आहे का?कलमठ ,वरवडे, पिसेकामते, आशिये यांना पर्यायी विजपुरवठा होण्यासाठी सर्वे करा तात्पुरती मलमपट्टी नको, त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी आम. नितेश राणें यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करु तसेच संध्याकाळी ६ नंतर वायरमन सहज उपलब्ध होत नाहीत. त्यावेळी नेहमी आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करावा लागतो, त्यामुळे गावासाठी मंजूर असलेले वायरमन गावातच रहावेत अशी मागणी मेस्त्री यांनी केली. तुमचे सहकार्य नसेल तर गावात देखील तुम्हाला सहकार्य कुठल्याही पद्धतिचे होणार नाही तसेच गावात असलेले कमी ट्रांसफार्मर व जास्त विजजोडण्या यावर भविष्यात आंदोलन करण्याची वेळ आणू नका असा इशारा भाजपा युवामोर्चा सरचिटणीस संदिप मेस्त्री यानी दिला आहे.. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरिष भगत, श्रीराम राणें उपस्थित होते.
