आ.वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
*⚡मालवण ता.२५-:* नांदोस गावच्या सरपंच आरती नांदोस्कर आणि माजी सरपंच अशोक नांदोस्कर यांनी आज आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.नांदोस्कर कुटुंबीय शिवसेनेत स्वगृही परतल्याने पुष्पगुच्छ देऊन शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. काही वर्षांपूर्वी नांदोस गावच्या सरपंच आरती नांदोस्कर आणि माजी सरपंच अशोक नांदोस्कर यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता मात्र आज पुन्हा नांदोस्कर कुटुंबीयांनी शिवसेनत प्रवेश केला या प्रवेशानंतर बोलताना अशोक नांदोस्कर यांनी मालवण तालुका तसेच नांदोस गावात शिवसेनेच्या माध्यमातून सुरु असलेली विकास कामे लक्षात घेता खऱ्या अर्थाने शिवसेनाच विकास करू शकते त्यामुळे खासदार विनायक राऊत,पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, सतीश सावंत यांच्यावर विश्वास ठेऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे सांगत यापुढे सर्वांना सोबत घेऊन निवडणूकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळवून देऊ असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, विभाग प्रमुख विजय पालव, डॉ.जी.आर सावंत, माजी सभापती बाळ महाभोज, देवा रेवडेकर, बाबू टेंबुलकर, पराग नार्वेकर, किरण प्रभू, निलेश पुजारे, बंडू ठाकूर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
