अनधिकृत उत्खननप्रकरणी ८ दिवसात कठोर कारवाई करणार

ना.बाळासाहेब थोरात व ना.अब्दुल सत्तार यांचे महिंद्र सावंत यांना आश्वासन

*⚡कणकवली ता.२५-:* कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे सिलिका माफिया मार्फत सीलिका वाळूचे मोठ्या प्रमाणात अनधिकृत उत्खनन चालू आहे.याबाबत आहे.येत्या ८ दिवसात कलेक्टरना आदेश देवून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी दिल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महिंद्र सावंत यांनी सांगितले. कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे सिलिका माफिया मार्फत सीलिका वाळूचे मोठ्या प्रमाणात अनधिकृत उत्खनन चालू आहे.या संदर्भात फेब्रुवारी २०२१ मध्ये तहसीलदार यांना निवेदन देऊन यातील अधिकृत खाणी किती व अनधिकृत खाणी कीती? हा प्रश्न विचारला होता.त्यानंतर तहसीलदार यांनी धाडी टाकून बरेच ट्रक व वॉशिंग प्लांट यांना सिल लावले होते व दंडही केला होता.परंतु थोडे दिवस जाताच पकडलेला माल अनधिकृतपणे पास नसताना पोलिस संरक्षणात कोल्हापूरला रवाना झाला आहे.अजूनही संध्याकाळी ६ वाजल्यापासून ओव्हरलोड गाड्या फोंडा व वैभववाडी मार्गे सिलीका बिनदिक्कतपणे कोल्हापूरला जात आहेत. अनधिकृतपणे काढलेल्या सिलिका वॉशिंग प्लांटमध्ये येवून धुतली जाते व ती पियाळी आणि इतर नदीमध्ये सोडली जाते.त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता आहे. तरी आपण राज्याला मिळणारा महसूल हा सुमारे वर्षाला २०० कोटी कसा मिळविता येईल ते पाहावे असे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महिंद्र सावंत यांनी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांना दिले आहे.येत्या ८ दिवसात कलेक्टरना आदेश देवून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे महिंद्र सावंत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page