बी. फार्मसी पदवी घेतल्यानंतर व्यवसायिक संधीबाबत तोंडवली येथे ऑनलाईन वेबिनार

*⚡कणकवली ता.२५-:* भारतातील प्रशिक्षण व प्लेसमेंट संस्था क्लिनी इंडिया व सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली यांच्यावतीने बी. फार्मसी पदवी घेतल्यानंतर व्यवसायिक संधिबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्लेसमेंट प्रोग्रामबाबत ऑनलाईन वेबिनार नुकताच गुगल मिटच्या माध्यमातून पार पडला. वेबिनारमध्ये तोंडवली बी. फार्मसी कॉलेजचे तृतीय व चतुर्थ वर्षातील  सत्तर विद्यार्थ्यांसह प्राचार्य तुकाराम केदार , क्लीनी इंडियाचे श्री विशाल चौधरी,  कार्यक्रम समन्वयक प्रा.स्वाती पाटील, यांच्यासह इतर प्राध्यापक सहभागी झाले होते. बी फार्मसी पदवी घेवून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना  नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील? याची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.फार्मसी क्षेत्रातील क्लिनिकल रिसर्चमध्ये करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.तसेच मुलाखतीसाठी ऑनलाईन प्रशिक्षणाच्या माध्यमातून कशी तयारी करावी याचे मार्गर्शन करण्यात आले. विद्यार्थी ,प्राध्यापक व क्लिनी इंडियाच्या तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून सविस्तर चर्चा करण्यात आली.विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे निरसन करण्यात आले. वेबिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यासाठी सिंधुदुर्ग  एज्युकेशन सोसायटीचे सचिव निखिल सावंत यांनी सहकार्य केले

You cannot copy content of this page