*⚡मालवण ता.२४-:* विकास अध्ययन केंद्र मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता दांडी आवार मत्स्य प्रशिक्षण केंद्र याठिकाणी मच्छीमार महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मच्छीमार महिलांना पंतप्रधान मत्स्य संपदा योजना आणि किसान क्रेडिट कार्ड आदी शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमास आमदार वैभव नाईक, सहाय्यक मत्स्य आयुक्त रवींद्र मालवणकर, विकास अध्ययन केंद्राचे सुरेश शेळके, रेणुका कड, सामाजिक कार्यकर्त्या चारुशिला देऊलकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विकास अध्ययन केंद्र प्रकाशित ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.
मच्छीमार महिलांसाठी दांडी आवार येथे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन
