प्रतिभा चव्हाण यांना ‘नारीशक्ती’ पुरस्कार प्रदान

*⚡सावंतवाडी ता.२३-:* विद्याविकास अध्यापक विद्यालय, आजगाव येथील प्रा. प्रतिभा महेश चव्हाण यांना मिणचे (कोल्हापूर) येथील आनंदगंगा फाऊंडेशन यांचा ‘नारीशक्ती पुरस्कार 2021’ नुकताच प्रदान करण्यात आला. प्रा. चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कोल्हापूर येथील संजय घोडावत यूनिव्हर्सिटीच्या सभागृहात प्रा. प्रतिभा चव्हाण यांना नारीशक्ती 2021 पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाल श्रीफळ, गौरव पत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी वारणा भगिनी मंडळाच्या अध्यक्ष स्नेहा कोरे, प्रा. डॉ.नगीना माळी, अविष्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय पवार एस.सी.ई.आर.टी. पुणे येथील सदस्य नामदेव रेपे, दादू सलगर तसेच आनंदगंगा फाऊंडेशनचे तानाजी पवार, वासंती पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा.प्रतिभा चव्हाण यांना गौरविण्यात आले. प्रा.प्रतिभा चव्हाण गेल्या तेवीस वर्षांपासून अध्यापक विद्यालय, आजगाव येथे सेवेत असून सामाजिक, शैक्षणिक कला व सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.तसेच ‘रात्रीस खेळ चाले’ सारख्या मालिकांतून त्या विविध चित्रपट व मालिकांद्वारे आपल्या कलेचे प्रदर्शन खास मालवणी ढंगात करीत आहेत. सामाजिक क्षेत्रासोबतच त्या कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी वाडमय मंडळ, ज्ञानदीप शिक्षण मंडळ तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी चालविल्या जाणाऱ्या प्रयाण सारख्या संस्थेत त्या सक्रिय सहभाग देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना मिणचे (कोल्हापूर) येथील आनंदगंगा फाउंडेशनने नारीशक्ती 2021 पुरस्कार देऊन नुकतेच कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले. प्रा. चव्हाण यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page