गड व किल्ल्यांना गतवैभव प्राप्त करून देणे हीच बाबासाहेब पुरंदरे यांना खरी श्रद्धांजली ठरेल

कणकवली येथे बाबासाहेब पुरंदरे यांना वाहिली श्रद्धांजली

*⚡कणकवली ता.२१-:* शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा महानाट्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास अबालवृद्धांपर्यंत पोहोचला. हे त्यांचे कार्य अतुलनीय आहे.सिंधुदुर्गातील गड व किल्लांची दुरवस्था झाली आहे. या गड व किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद विसरून शासन दरबारी पाठपुरवठा करून गड व किल्ल्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त करूया देऊया ही बाबासाहेब पुरंदरे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. सुकळवाड येथे.शिवसृष्टी निर्मित कलादालन उभारण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न सिंधुदुर्गवासीयांनी एकत्र येऊन पूर्ण केले करूया अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. पद्मभूषण व महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने कणकवली येथील मराठा मंडळाच्या सभागृहात श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आम.परशुराम उपरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, कणकवलीच्या प्रभारी तहसीलदार प्रिया हर्णे-परब, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, शिवसेना नेते संदेश पारकर, राष्ट्रवादी नेते काका कुडाळकर, डॉ. विद्याधर तायशेट्ये, अशोक करंबेळकर, सी.ए. अमोल खानोलकर, प्रा. हरिभाऊ भिसे, मोहन सावंत, रवींद्र तांबोळकर, गजानन माळी, दया मेस्त्री, चंद्रशेकर उपरकर, संतोष सावंत, संजय मालंडकर, अनिल हळदिवे, काँग्रेस ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर, अक्षता कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते. आम. वैभव नाईक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र महान आहे. त्यांचे हे महान सर्वसामान्यांपर्यंच पोहोचविण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले. त्यांनी आपल्या लेखणी व मार्गदर्शनातून जाणता राजा या महानाट्याची निर्मिती केली. या महानाट्यातून त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास अबालवृद्धांपर्यंत पोहोचला. हे त्यांचे कार्य अतुलनीय असून सुकळवाड येथे कलादालन उभारण्याचे स्वप्न होते हे स्वप्न आपण सर्वांनी मिळून पूर्ण करूया. हे कलादालन उभारण्यासाठी शिवसेना व शासनाच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. राजन तेली म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तळगाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. बाबासाहेबांचे सिंधुदुर्गाशी वेगळे नाते होते. जाणता राजा या महानाट्यातून बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचविला. त्यांच्या कार्याला तोड नाही. सिंधुदुर्गात असलेल्या गड व किल्ल्यांची आपण सर्वांनी मिळून संवर्धन व जतन बाबासाहेबांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली वाहूया. परशुराम उपकर म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे व माझे वेगळे नातं होते. बाबासाहेब हे दिलेल्या शब्दाला जागणारे व्यक्तिमत्त्व होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यावर त्यांचे नितांत प्रेम होते. बाबासाहेबांनी आपल्या व्याख्यानमालेतून अबालवृद्धांना इतिहास समजून सांगितला आणि सिंधुदुर्गात जाणता राजा महानाट्याप्रयोग सादर करताना अनेक अडचणींनी निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्या अचडणींनी मात करून हे महानाट्याचे सादरीकरण करण्यात आला. या नाट्याला सिंधुदुर्गवासीयांची उत्स्फूर्त लाभला, असे सांगून उपरकर यांनी बाबासाहेबांच्या सहवासातील काही कटू आठवणीही उपस्थितांना सांगितल्या. संदेश पारकर म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब यांच्या निधनामुळे देशाचे व महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून त्यांच्या विचार व आचार आपण सर्वांनी आत्मसात करून बाबासाहेबांचा कार्य पुढे नेऊया. सतीश सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवचरित्र जगाच्या कानाकोपर्‍यापर्यंत पोहोचविण्याचे काम बाबासाहेबांनी केले. त्यांचे हे कार्य महान देऊन त्यांना आदरांजली वाहून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन सिंधुदुर्गवासीयांना केले. प्रारंभी बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार व पुष्प घालून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शिक्षक तथा कवी कमलेश गोसावी यांनी मी सिंधुदुर्ग बोलतोय ही कविता सादर करत सिंधुदुर्ग किल्ल्यांची व्यथा शब्दबद्ध करत बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. या शोकसभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकसभेच्या निमित्ताने डॉ गाड यांनी बाबासाहेबांसोबत व्यतित केलेल्या त्या सुवर्णक्षणांना उजाळा दिला. माजी विस्तार अधिकारी मोहन सावंत यांनी किल्ले रायगडावर गेलेल्या भेटीदरम्यान ची स्व.बाबासाहेबांची आठवण सांगितली.अक्षरसिंधु साहित्य कला मंचचे अध्यक्ष प्रा.हरिभाऊ भिसे यांनी बाबासाहेबांच्या पुणे येथील वाड्यावरील भेटीची आठवण सांगितली. शिक्षक तथा कवीयांनी मी सिंधुदुर्ग बोलतोय ही कविता सादर करत सिंधुदुर्ग किल्ल्याची व्यथा शब्दबद्ध करत बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. डॉ.विद्याधर तायशेट्ये यांनी स्व. बाबासाहेबांचे सुकळवाड येथील शिवसृष्टी निर्मिती चे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि समाजातील सर्व स्तरातील घटकांनी हातभार लावावा असे आवाहन केले. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनीही शाब्दिक श्रद्धांजली वाहिली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कणकवली मराठा मंडळ येथील शोकसभेत स्व.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली. स्व. बाबासाहेब यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी श्रध्दांजली वाहिली.

You cannot copy content of this page