मनसेचा एसटी कर्मचारी आंदोलनास पाठिंबा

परशुराम उपरकर यांनी आंदोलनस्थळी दिली भेट

*⚡सावंतवाडी ता.१८-:* मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी आगारात सुरु असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनाला भेट देऊन सक्रिय पाठिंबा जाहीर केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर एसटी कामगारांचे जे विलिनीकरण लढ्यासाठी आंदोलन सुरू आहे त्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या प्रत्येक मनसे सैनिक तसेच नेत्यांना त्याठिकाणी जाऊन पाठिंबा देऊन या लढ्यात उतरण्याचे आदेश दिले आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज मनसेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर सावंतवाडीत दाखल झाले असता त्यांनी सावंतवाडी आगारातील सुरू असलेले आंदोलनाला भेट देत सर्व कर्मचाऱ्यांना मनसेचा सक्रिय पाठिंबा जाहीर केला. तर कोणीही बळजबरीने आपणास एसटी सुरू करण्यास भाग पाडले तर आम्ही शांत बसणार नाही तुमच्या लढ्यात आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी प्रसंगी तुमच्यासाठी रस्त्यावर उतरू त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे ते निलंबन मागे घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न चर्चा करून निलंबन मागे घेण्यास भाग पाडू असा शब्द श्री उपरकर यांनी उपस्थित आंदोलनकर्त्यांना दिला तसेच मनसे पूर्णता आपल्या लढ्यास सोबत आहे अशी ग्वाही दिली तर उपस्थित आंदोलनकर्त्यांनी उपरकर यांनी त्या ठिकाणी आवर्जून येऊन मार्गदर्शन केले व खंबीर पाठिंबा दिला त्याबद्दल माजी आमदार उपरकर यांचे आभार मानले. यावेळी परिवहन जिल्हाकार्याध्यक्ष संतोष भैरवकर सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे कुडाळ मा तालुकाध्यक्ष बाबल गावडे कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी, सावंतवाडी उपतालुकाअध्यक्ष प्रकाश साटेलकर बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे ग्रामपंचायत सदस्य आदेश सावंत इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे उपशहरअध्यक्ष शुभम सावंत आरोस विभागअध्यक्ष मंदार नाईक सावंतवाडी लॉटरीसेना तालुकाअध्यक्ष राजेश मामलेकर विभागअध्यक्ष संदेश शेट्ये मनविसे उपतालुकाअध्यक्ष गोविंद मोरये तानाजी मेस्त्री संतोष सावंत सुमेध सावंत आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page