कलंबिस्त, शिर्शिंगे व वेरले गावला कायमस्वरूपी तलाठी द्या…

त्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सावंतवाडी : कलंबिस्त, शिर्शिंगे व वेरले या तीन गावांसाठी असणारे तलाठी यांची बदली करण्यात आली असून, त्यामुळे त्या गावातील तलाठी पदाची जागा रिक्त झाली आहे. या तिन्ही गावांना कायमस्वरूपी तलाठी देण्यात यावा. तसेच आंबोली मंडल विभाग कायम ठेवावे अशा मागणीचे निवेदन या पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी प्रशांत पुनाळेकर यांना दिले आहे. यावेळी त्यांनी या गावासाठी कायमस्वरुपी तलाठी देण्याबाबत निश्चित कार्यवाही केली जाईल तसेच माडखोल मंडल विभाग सध्या कार्यान्वित आहे ते आंबोलीचा कायम ठेवण्याबाबत प्रयत्न केला जाईल. असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच कलंबिस्त गावाला कायमस्वरूपी पोलीस पाटील देण्याबाबत भरती प्रक्रिया लवकरच लागावी यासाठी आपण प्रयत्न करेन असेही त्यांनी स्पष्ट केले. कलंबिस्त पंचक्रोशीत तलाठी कायमस्वरूपी देण्याबाबत व सध्या आंबोली मंडळ विभाग बदलून माडखोल मंडळ विभाग करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी श्री पुनाळेकर यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले यावेळी माजी सभापती रवींद्र मडगावकर माजी जि प सदस्य पंढरी राऊळ सुरेश शिर्के कृष्णा सावंत नारायण राऊळ दिलीप राऊळ सिताराम लाड प्रशांत देसाई संतोष चव्हाण भिवा धों ड सत्यवान राऊळ बाबाजी धोड एकनाथ राऊळ अरुण राऊळ प्रल्हाद तावडे विश्वनाथ परब अनिल राऊळ गजानन राऊळ विठ्ठल सावंत तुकाराम धोंड गजानन राठोड दशरथ पास्ते  स गुण पास्ते अंतोन रोड्रिक्स विठ्ठल सावन नामदेव पास्ते संदेश बिडये दिवाकर सावंत अनिल सावंत सूर्यकांत राजगे अनंत सावंत आदींच्या सह्यांचे निवेदन यावेळी प्रांताधिकारी यांना देण्यात आली यावेळी श्री मडगावकर व शिर्के यांनी स्पष्ट केले कलंबिस्त पंचक्रोशीत गेल्या दीड महिन्यापासून कायमस्वरुपी तलाठी नाही आहे त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत त्यामुळे कायमस्वरूपी तलाठी देण्यात यावा कलंबिस्त महसूल मंडळ हे आतापर्यंत आंबोलीला होते ते आता माडखोल करण्यात आले आहे त्यामुळे आंबोली मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आंबोली ला जोडून कलंबिस्त पंचक्रोशी असल्याने आंबोली मंडल कायम ठेवावे माडखोल करू नये जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होईल यावर श्री पुनाळेकर यांनी स्पष्ट केले सध्या तालुक्यातला तलाठी संख्या कमी आहे त्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात माडखोल किंवा दा णोली या दोन तलाठी यांच्याकडे प्रभारी कारभार कलंबिस्त देण्यात येईल व त्यानंतर येत्या काही दिवसात कायमस्वरूपी तलाटी देण्याबाबत विचार केला जाईल तसेच माडखोल मंडली भाग काढून आ बोली करण्याबाबतही निर्णय घेतला जाईल तसेच शिरशिंगे येते पाऊस मोजण्यासाठी प्रजन्य मापक केंद्रही बसवण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी श्री धोंडे यांनी शिरसिंगी येथे प्रजन्य मापन मशीन कायमस्वरूपी बसवावी अशी मागणी केली कलंबिस्त गावाला कायमस्वरूपी पोलीस पाटील द्या यावेळी माझी जि प सदस्य पंढरी राऊळ व माजी सरपंच कृष्णा उर्फ बाळा सावंत यांनी स्पष्ट केले कलंबिस्त गावाला गेली कित्येक वर्षे पोलीस पाटील नाही आहे त्यामुळे तेथे कायमस्वरूपी पोलीस पाटील नियुक्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे शिरशिंगे पोलीस पा ट लावर अवलंबून राहावे लागत आहे अशा मागणीचे ग्रामस्थांचे निवेदन यावेळी देण्यात आले यावेळी श्री पुनाळेकर यांनी सध्या पोलिस पाटलांची भरती झालेली नाही आपण जिल्हाधिकारी यांच्या कडे आपण तसे निश्चितपणे कळवले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी नायब तहसीलदार श्री बांदेकर व श्री परब उपस्थित होते फोटो सावंतवाडी कलंबिस्त पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कायमस्वरुपी तलाठी व पोलीस पाटील मिळावा या मागणीसाठी प्रांताधिकारी प्रशांत पुनाळेकर यांना निवेदन देताना पंढरी रावळ रवींद्र म डगावकर सुरेश शिर्के कृष्णा सावंत दिलीप रा ऊळ प्रल्हाद तावडे जीवन लाड प्रशांत देसाई संतोष चव्हाण नारायण राऊळ गजानन राऊळ आधी

You cannot copy content of this page