*अज्ञाता विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
*💫सावंतवाडी दि.२४-:* न्यु सालईवाडा येथील एका फ्लॅट मध्ये अज्ञात चोरट्याने तब्बल १ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने चोरले आहेत. हा प्रकार १९ डिसेंबर रोजी उघडकीस आला आहे. याबाबतची तक्रार नारायण कृष्णाजी सातार्डेकर यांनी पोलिस स्थानकात दिली असून, अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातार्डेकर यांच्या फ्लॅट मध्ये मेंटनस चे काम काही कामगार करत होते. परंतु त्यांच्याकडे ही चौकशी केली असता, त्यानी आपण दागिने घेतले नसल्याचे सांगितले आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
