मालवण दि-: केंद्र सरकारने देशातील मच्छिमारासाठी जाहीर केलेल्या मत्स्य संपदा योजनेचा लाभ गगाबीत समाजातील प्रत्येक सदस्याला कसा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे तळागाळातील मच्छिमारांना या योजनेचा फायदा करून देण्यासाठी गाबीत समाज बांधवाबरोबर आपले प्रयत्न राहणार असून मच्छिमारी व्यवसायाला पूरक जोडधंदा म्हणून ही योजना महत्त्वाची ठरणारी आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी येथे बोलताना केले. अखिल भारतीय गाबित महासंघ आणि मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीतर्फे दांडी येथील दांडेश्वर मंदिर येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती मच्छीमारांना देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ भादुले यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी मत्स्य विभाग सदैव तत्पर राहील. या योजनेद्वारे मासेमारी व्यवसायाचा सर्वंकष विकास करण्याचा सरकारचा संकल्प आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला आपण आंध्रप्रदेश, केरळ आणि प. बंगाल यासारख्या राज्यांप्रमाणे मासेमारीत अग्रेसर बनवूया असे सांगितले यावेळी अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे माजी अध्यक्ष अॅड. काशिनाथ तारी, कार्याध्यक्ष दिगंबर गावकर, महाराष्ट्र अध्यक्ष संजय धुरत, जिल्हा संघटक चंद्रशेखर उपरकर, जिल्हा सचिव राधिका कुबल, तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, उपाध्यक्षा चारुशीला आचरेकर, खजिनदार मिथुन मालंडकर, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, विजय देवकर, गाबित पतसंस्था अध्यक्ष आपा पराडकर, वायरी सरपंच भाई ढोके, तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर, नगरसेविका सेजल परब, जिल्हा श्रमजीवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, मालवण तालुका श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, मालवण मच्छीमार संस्थाध्यक्ष विकी चोपडेकर, श्री रामेश्वर मच्छीमार सोसायटी सचिव नंदकिशोर वाक्कर, संचालक सुधीर जोशी, घनश्याम झाड, बाबी जोगी, पर्यटन व्यावसायिक रुपेश प्रभू, संजय केळुसकर, जगदिश तोडणकर, अरविंद मोंडकर, भाऊ मोरजे, संतोष ढोके, अक्षय रेवंडकर, पवनकुमार पराडकर, रश्मी रोगे, दादा वाघ, दिक्षा ढोके, अनिल करंजे, घन:श्याम जोशी आदी उपस्थित होते. शेवटी प्रमोद कोलंबकर यांनी आभार मानले फोटो मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिर येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती मच्छीमारांना देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ भादुले यांचे स्वागत करताना माजी आमदार परशुराम उपरकर
तळागाळातील मच्छिमारांना मत्स्य संपदा योजनेचा फायदा करून देण्यासाठी राहणार प्रयत्नशील- परशुराम उपरकर
