प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया..
*💫कणकवली दि.२४-:* इतर मागास प्रवर्गातील वैश्य वाणी, वाणी या जातीच्या दाखल्यावर चुकीचे संदर्भ देत शासन निर्णय नमूद करण्यात आले आहे. सदर जात प्रमाणपत्रे अवैध ठरण्याची भीती निर्माण होत आहे. त्यामुळे त्या शासन निर्णय याचा संदर्भ घेत ही जात प्रमाणपत्रे नव्याने देण्यात यावीत, अशी मागणी केली असल्याची प्रतिक्रिया कणकवली तालुका वैश्य समाज अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी दिली. इतर मागासवर्ग ‘ या जातीप्रवर्गाची चुकीचा शासन निर्णय व त्याचा दिनांक नमूद असलेली जात प्रमाणपत्रे योग्य तो शासन निर्णय व त्याचा योग्य ता दिनांक नमूद करुन सुधारीत करुन निर्गमीत करणेत यावीत,अशी मागणी प्रताधिकारी यांच्याकडे केली.अन्यथा जात प्रमाणपत्र व त्याच्या वैधते अभावी भविष्यात जनतेच्या होणाऱ्या कोणत्याही स्वरुपाच्या नुकसानीची जबाबदारी प्रशासनाची असेल,असा इशारा दादा कुडतडकर यांनी दिला. यावेळी वैश्यवाणी समाजाचे अध्यक्ष दादा कुडतरकर, नगरसेवक कन्हैया पारकर, अण्णा कोदे, महेश कोदे, राजन पारकर, लवु पिळणकर, आरक्षित समाजाचे अध्यक्ष सुजित जाधव आदी उपस्थित होते.
