कणकवली कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांची छाननी; डॉ. सौरभ तुपकर यांनी स्विकारला पदभार..
*💫कणकवली दि.२४-:* कणकवली भुमिअभिलेख कार्यालयाचे प्रभारी उपअधीक्षक प्रकाश भिसे यांचा पदभार कमी करण्यात आला आहे.वेंगुर्ले उपअधीक्षक डॉ. सौरभ तुपकर यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे. दर मंगळवारी व शुक्रवारी कणकवली कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न सोडवतील.पुढील महिनाभरात कणकवली तालुक्यातील नागरिकांची राहिलेली प्रलंबित कामे मार्गी लागतील, असा विश्वास भुमिअभिलेख जिल्हा अधीक्षक डॉ. विजय वीर यांनी व्यक्त केला आहे.तसेच डॉ.सौरभ तुपकर यांनी पदभार स्विकारला,,असेही त्यांनी सांगितले. कणकवली कार्यालयातील विविध तक्रारी आमच्याकडे येत होत्या. गेल्या तीन-चार महिन्यात आणखीनच वाढल्यामुळे आज छाननी करण्यात आली आहे.संपूर्ण कार्यालयीन दाखल झालेले अर्ज व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी सर्व प्रकरणांची छाननी केली जात आहे. या कार्यालयात आतापर्यंत दाखल झालेली जी प्रकरणे आहेत ती येत्या महिन्याभरात निकाली काढली जातील. लोकांच्या ज्या तक्रारी आहेत, त्या संदर्भात तातडीने निर्णय करुन जे दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया कणकवली भूमी अभिलेख भेटी दरम्यान डॉ. विजय वीर यांनी व्यक्त केली आहे.
