*💫वेंगुर्ला दि.२४-:* श्री स्वामी समर्थ कला क्रीडा मंडळ आडेली खुटवळवाडी च्या वतीने सन २०२० मध्ये दहावी – बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या खुटवळवाडी – जांभरमळा भागातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.यावेळी मंडळाच्या वतीने कार्यक्षेत्रातून दहावी व बारावीतील प्रथम ५ क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सचिन गडेकर, सचिव नाना कुडाळकर,महेंद्र काजरेकर,विकास केळुसकर,अजय गडेकर, तुषार कांबळी,हेमंत पेडणेकर,उमेश शेणई,माधुरी कुडाळकर,महेश पेडणेकर, मदन धुरी,शिवाजी धुरी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सुकृत दामले,तन्मय शेणई, निकिता पेडणेकर, योगिनी कुडाळकर, अश्विनी म्हापणकर,हर्षाली धुरी,ममता होडावडेकर,सेजल धुरी,रेश्मी सुकळवाडकर,गोपाळ धुरी,निकिता म्हापसेकर इत्यादी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
आडेली खुटवळवाडी येथील विद्यार्थ्यांचा गुणगौरव
