ICC नॉकआउट सामन्यात न्यूझीलंडवर ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा; किवींना नमवून बनला टी-20 चा नवा चॅम्पियन
*⚡दुबई दि.१४-:* आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी-20 विश्वचषकच्या अंतिम सामन्यात डेविड वॉर्नर आणि मिशेल मार्शच्या जबरदस्त अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आयसीसी नॉनआऊट स्पर्धेत न्यूझीलंडवर वर्चस्व कायम ठेवले आणि यंदा केन विल्यमसनच्या नेतृत्वात किवी संघावर 8 विकेटने मात करून स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
