कथामालेचा ‘नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ आचरा येथील यशराज प्रेरणा युवा संघटनेला जाहीर

*⚡मालवण ता.१३-:* अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण तालुका शाखेचा ‘बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार’ मालवण तालुक्यातील आचरे येथील ‘यशराज प्रेरणा’ ह्या युवा संघटनेला जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कार वितरण सोहळा बॅ. नाथ पै यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार दि.१६ जानेवारी २०२२ रोजी आचरे येथे संपन्न होणार असून पुरस्कार वितरण बॅ. नाथ पै यांचे जवळचे स्नेही बाबूकाका अवसरे (मालवण) यांच्या हस्ते होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्रथमिक विभाग उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, सेवांगणचे सचिव लक्ष्मिकांत खोबरेकर, कथामाला कार्यकर्त्या सुजाता सुनिल टिकले, आचरा सरपंच प्रणया टेमकर आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष पांडुरंग कोचरेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. यशराज प्रेरणा ही युवा संघटना गेली सात-आठ वर्षे आचरे पंचक्रोशीत शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण प्रबोधन, आपद् ग्रस्तांना मदत, सांस्कृतिक, क्रीडा, अध्यात्मिक आदी विविध क्षेत्रात कार्यरत आहे. कोरोना आपद्ग्रस्त कालावधीत संघटनेने अनेक उपक्रम घेवून सामाजिक भान राखले आहे.

You cannot copy content of this page