Headlines

गरीब व गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील…

सुतार समाज जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांचे प्रतिपादन

वैभववाडी प्रतिनिधी समाजाच्या विकासासाठी समाज बांधवांची एकजूट महत्त्वाची आहे. समाजातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. तरुणांनी रोजगाराच्या संधी शोधून आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. असे प्रतिपादन सुतार समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार-शिल्पकार समाज मंडळ व वैभववाडी तालुका सुतार समाज मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी येथील अर्जून रावराणे विद्यालय येथे सुतार समाज बांधव यांची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये सर्वच विषयांवर चर्चा करण्यात आली. लुपीन फाऊंडेशन च्या वतीने सुतार कारगीर यांना आरटीझन कार्ड करून देण्या संदर्भात लुपीन फाऊंडेशनचे कुडतरकर यांनी मार्गदर्शन केले. शनिवार दि 20 नोव्हेंबर रोजी समाजाचा भव्य मेळावा घेण्यात येणार आहे. याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. या सभेला डि.के.सुतार, रितेश सुतार, रमेश पांचाळ, प्रताप सुतार, बाळा पांचाळ, सुनिल पांचाळ, हनुमंत सुतार, सुरेश सुतार, रमाकांत पांचाळ, विठोबा सुतार, सदा मेस्त्री, मंदार सुतार व सुतार समाज बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page