सिंधुदुर्गातही 17 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

आम वैभव नाईक यांनी संपकरी एस.टी. कामगारांची घेतली भेट

*⚡कणकवली ता.१२-:* महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी सिंधुदुर्गातील एस.टी. कर्मचारी संपावर ठाम असून आजच्या सहाव्या दिवशीही 100% वाहतूक बंद होती.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन आगारातील 17 एस.टी. कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे समजते .निलंबनाची कारवाई केलेल्यांमध्ये कणकवली 5, मालवण 7 व कुडाळ 5 आगारातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्गात संपाला आता वेगळे वळण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शासनाने कितीही कारवाईचा बडगा उचलला तरीही आता माघार घेणार नाही असा ठाम निर्धार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सहाव्या दिवशीही सिंधुदुर्गमधील वाहतूक १०० टक्के बंद होती . बस स्थानकांवर शुकशुकाट होता. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावे ही कर्मचाऱ्यांची मागणी आहे.त्यामुळे या मागणीसाठी गेले 17 दिवस राज्यभरात ठिकठिकाणी काम बंद सुरू करण्यात आले होते.सिंधुदुर्ग विभागामध्ये कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने महामंडळाची वाहतूक व्यवस्था पूर्णत कोलमडली आहे. रा.प. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण व्हावे हीच प्रमुख मागणी आहे . सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत सुरू केलेल्या संपाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे . शासनाने कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे . एसटी कर्मचारी संपात माघार घेत नसल्याने प्रशासनाने आता निलंबनाच्या कारवाईला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्गातील तीन आगारातील 17 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असल्याचे समजते. निलंबनाची कारवाई केलेल्यामध्ये कणकवली 5 ,मालवण 7 व कुडाळ 5 अशा 17 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. दरम्यान कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली एसटी विभागीय कार्यशाळा येथे जात संपकरी एसटी कामगारांची भेट घेतली व या प्रश्नाबाबत शासन दरबारी बाजू मांडणार असल्याचे सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांवर झालेल्या निलंबन कारवाई बाबत यावेळी कर्मचाऱ्यांनी आम. वैभव नाईक यांचे लक्ष वेधले.

You cannot copy content of this page