*⚡सावंतवाडी ता.१३-:* नगराध्यक्ष संजू परब यांना आमदार दीपक केसरकर यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. कोणी कोणाच्या जमिनी लाटल्या हे सर्व जनतेला माहिती आहे. तर आमदार दीपक केसरकर यांनी घेतलेल्या जमिनी ह्या जनतेला फसवून नाही. तर त्यांना योग्य मोबदला दिला आहे. अशा शब्दात ज्येष्ठ नगरसेविका सौ अनारोजीन लोबो यांनी नगराध्यक्ष संजू परब यांना प्रतिउत्तर दिले आहे.
यावेळी त्या पुढे म्हणाल्या की, नगराध्यक्ष संजू परब यांनी स्वतःचा बिल्डिंग मधील ड्रेनेज चे पाणी रस्त्यावर सोडले असून, याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाचा गैरवापर करून धमकी देत असल्याचा आरोप नगरसेविका लोबो यांनी केला आहे.
