प्रशिक्षणाच्या अटीमुळे निवडश्रेणी लाभापासून वंचित शिक्षकांना मार्गदर्शन करणार

ओरोस येथे 17 रोजी खास मार्गदर्शन सभेचे आयोजन

*⚡कणकवली ता.१३-:* शासनाकडून सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम मुळातच अतिविलंबाने सुरु झाला . तसेच आलेला प्रशिक्षण कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने वेळीच व योग्य प्रकारे राबविला नाही परिणामी तत्कालीन कार्यरत शिक्षकांची निवडश्रेणी लाभासाठीच्या प्रशिक्षणाची अट पूर्ण होऊ शकली नाही . यात शिक्षकांचा कोणताही दोष नसताना ते शिक्षक अकारण निवडश्रेणीसाठी अपात्र ठरुन त्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले . मात्र प्रशिक्षण कार्यक्रम न राबविणाऱ्या कोणत्याही कर्मचारी अथवा अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात आलेले नाही .यासंदर्भात बुधवार १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वा . सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या . सिंधुदुर्गनगरी ( ओरोस ) या ठिकाणी पात्र सेवानिवृत्त शिक्षकांची सभा आयोजित केली आहे .या सभेत सुरेश पेडणेकर , चंद्रकांत अणावकर , सुधाकर देवस्थळी मार्गदर्शन करणार आहेत , अशी माहिती प्रभाकर ढवळ , सोनू नाईक , कैवल्य पवार , रमेश आर्डेकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक प्रतिनिधीनी ही बाब प्रशिक्षण परिषद व शासन दरबारी वारंवार मांडून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली . अखेर २०/०७/२०२१ चा शासन निर्णय करुन दि . ३१/१०/२०२१ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षणाच्या अटीतून सवलत देण्यात आली . परंतु सदरचा शासन निर्णय मान्यताप्राप्त खाजगी संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांना लागू असल्यामुळे जि.प. सिंधुदुर्गचे शिक्षण व वित्त विभाग लाभ देण्यास तयार नाहीत . त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक प्रतिनिधींनी मंत्रालय पातळीवरील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या तीन बैठका करून त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या . शेवटी दि . २२/१०/२०२१ चा शासन निर्णय करुन वरील शासन निर्णय शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांनाही लागू करण्यात आला . याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी ( प्राथ.) यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन लाभ देण्याबाबतची निवेदने सादर केली आहेत . यामध्ये आता कोणतीही अडचण राहिलेली नाही . त्यासाठी बुधवार १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वा . सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या . सिंधुदुर्गनगरी ( ओरोस ) या ठिकाणी पात्र सेवानिवृत्त शिक्षकांची सभा आयोजित केली आहे . या सभेसाठी निव्वळ प्रशिक्षणाच्या अटीमुळे वरिष्ट अथवा निवडश्रेणीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शिक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे . तसेच संबंधित शिक्षकांनी आपल्याकडील सेवापुस्तकाची दुय्यम प्रत व सेवानिवृत्ती वेतन ( पेन्शन ) आदेशाची प्रत घेऊन उपस्थित राहावयाचे आहे . दि . ०१/०१/२००६ ते दि . २६ / ०२ / २०० ९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या पात्र शिक्षकांनी आपल्या सुधारित निवृत्ती वेतन आदेशाची प्रत आणावयाची आहे . या ठिकाणी सदरचे शासन निर्णय करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न याबाबतची माहिती देऊन आपणाला मार्गदर्शन करण्यात येणार आहे . सभेस उपस्थित राहताना कोवीड -१ ९ बाबतच्या नियमांचे पालन करावयाचे आहे .

You cannot copy content of this page