*⚡मालवण ता.१३-:* राज्य शासनात विलानीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या सहा दिवसांपासून पुकारलेल्या संपला सिंधुदुर्ग दिव्यांग संघटनेने पाठिंबा दिला आहे. शनिवारी सिंधुदुर्ग दिव्यांग संघटना मालवण शहराच्या वतीने मालवण बस स्थानक येथील संपकरी एसटी कर्मचारी यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्या मान्य झाल्या पाहिजेत. एसटी बसने प्रवास करताना दिव्यांग बांधवांना एसटी कर्मचारी यांचे नेहमीच सहकार्य असते, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, असे दिव्यांग बांधवांनी यावेळी सांगितले. यावेळी सत्यम पाटील, दत्ता कामतेकर, राजेंद्र गावडे, माधव माडये आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग दिव्यांग संघटनेचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा
