सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्गचा ओरोस येथे २६ डिसेंबरला जिल्हा मेळावा

*⚡कणकवली ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग चा अकरावा जिल्हा मेळावा सिंधुदुर्गनगरी(ओरोस) येथे रविवार २६ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. जिल्हा वारकरी संप्रदायाची सभा जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष ह.भ.प.रामचंद्र कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष हरीचंद्र परधीये,जिल्हा सचिव राजू राणे, खजिनदार मधुकर प्रभुगावकर, प्रभाकर सावंत, ह.भ.प.विजय सुतार,चंद्रकांत परब,विजय राणे, ह.भ.प. प्रकाश सावंत उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे ६५ वर्षावरील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, मृदंगमनी, प्रवचनकार यांना देण्यात येणारा मानाचा संतसेवा पुरस्कार यावर्षी ही देण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायातील संबंधित वारकऱ्यांनी आपल्या संपूर्ण माहिती व फोटोसह २० डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील असे अर्ज अध्यक्ष/सचिव सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग मुख्यकार्यालाय- हळवल ता. कणकवली, जिल्हा-सिंधुदुर्ग या पत्त्यावर पाठवावेत. असे आवाहन जिल्हा अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज, व सचिव राजू राणे यांनी केले

You cannot copy content of this page