शशिकांत नारकर यांची मिल्ट्रीमध्ये सुभेदार पदावर नियुक्ती

मैत्री परिवाराकडून कणकवली काॅलेजमध्ये केला सत्कार

*⚡कणकवली ता.१३-:* कणकवली काॅलेजमधील सन १९९५-९६ टी.वाय.बीकाॅम बॅचचा विद्यार्थी आणि त्या बॅचच्या मैत्री परिवारातील वर्गमित्र शशिकांत नारकर यांची मिल्ट्रीमध्ये सुभेदार या पदावरती नियुक्ती करण्यात आली.त्याबद्दल त्यांचा मैत्री परिवाराच्या वतीने शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. देवगड तालुक्यातील फणसगावचे सुपूत्र असलेल्या शशिकांत नारकर यांनी कणकवली काॅलेजमध्ये सन १९९५-९६ मध्ये बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.एन.सी.सी.विभागात शालेय जीवनापासून असल्यामुळे सैन्य दलात भरती होण्याचा ओढा जास्त होता.त्याचबरोबर उत्कृष्ट क्रीडापट्टू होते.त्यामुळे काॅलेज पूर्ण झाल्यावरती लगेचच सैन्य दलात भरती झाले.आपल्या उत्तम कामगिरीच्या जोरावर सुभेदार पदापर्यंत मजल मारली. काॅलेजमधील वर्गमित्र शशिकांत नारकर मिल्ट्रीमध्ये सुभेदार या पदावर पोहचल्याचा आनंद वर्गमित्र-मैत्रिणींना निश्चितच झाला आणि त्याचा सार्थ अभिमान सर्वांना होता.बाॅर्डरवरती देशाच्या रक्षणासाठी कार्यरत असणारा मित्र आपल्या गावी आल्यावरती त्याचा सत्कार करण्याचे निश्चित करण्यात आले होते. शशिकांत नारकर आणि सौ.दिपा नारकर-गौंडळकर या व्दयींना भेटण्यासाठी भेटीचे आयोजन करण्यात आले होते.सर्वजण तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्रित येण्याचा योग जुळून आला होता. आपल्यातील एक सहकारी मित्र काॅलेज पूर्ण झाल्यानंतर सैन्य दलात भरती होतो आणि सुभेदार पदापर्यंत मजल मारतो ही बाब निश्चितच सर्वांसाठी उर भरून आणणारी तसेच सार्थ अभिमान बाळगायला लावणारी होती.* सुभेदार शशिकांत नारकर आणि सौ.दिपा नारकर-गौंडळकर या व्दयींची कणकवली काॅलेजात टी.वाय.बीकाॅमच्या वर्गात भेट झाली.जुने वर्गमित्र मैत्रीणी एकत्रित आल्यावरती गप्पांची मैफिल रंगली होती. आपल्या रोजच्या बिझी सेड्युलमधून मैत्रीसाठी काही वेळ एकत्रित मिळून भेटून शशिकांत नारकर आणि दिपा नारकर-गौंडळकर या दोघांचा आनंद सगळ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन ताज्या केल्या.तसेत वाढदिवस देखील केक कापून साजरा केला. याप्रसंगी महेंद्र सांब्रेकर,संजय खानविलकर,महेश मर्गज,विजयश्री सावंत- कोदे,वैशाली सावंत,उल्हास तारी,जयराम डामरे,रविंद्र नाईक,मनोज सावंत,गंभाजी राणे,राजेंद्र जाधव,महेंद्र कदम उपस्थित होते.

You cannot copy content of this page