*⚡कणकवली ता.१३-:* तालुक्यातील खारेपाटण येथील प.पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेच्या वतीने खास दिवाळी व पुढील सर्व सणांच्या निमित्ताने संस्थेच्या ग्राहकासाठी गृहउपयोगी वस्तूसाठी कमीत कमी व्यजदरावर व सुलभ हप्त्यासहीत कर्ज योजना जाहीर केली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री नासिरभाई काझी यांनी दिली. या योजनेचा जास्तीत सभासदांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी सभासद ग्राहकांना केले आहे. प पु भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या एका खास सभेत दिवाळीत ग्राहकांना आकर्षक अशी कर्जरूपी योजना जाहीर करण्यात आली. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन शरद कर्ले,संचालक प्रवीण लोकरे,सौ श्रद्धा देसाई,शेखर राणे,राजेंद्र ब्रम्हदंडे,सुधाकर कर्ले,संतोष पाटणकर,संतोष हर्याण,विजय कुडतरकर,सौ वर्षा ब्रम्हदंडे,तज्ञ संचालक विजय कळंत्रे,सूर्यकांत तावडे तसेच संस्थेचे सरव्यवस्थापक श्री. मोरे शाखा व्यवस्थापक वामन पेडणेकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. पतसंस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या विविध कर्ज योजनेमध्ये *गृहउपयोगी वस्तू-* मध्ये फ्रीज,सर्वच प्रकारचे एल इ डी टीव्ही ,वाशिंग मशीन,होम थिएटर,घरगुती पिठाची चक्की,इन्व्हर्टर बॅटरी,वॉटर फिल्टर,शिलाई मशीन सोलर यांचा समावेश तर *शैक्षणिक उपयोग वस्तू* – मध्ये संगणक,लॅपटॉप,प्रिंटर यांचा समावेश तसेच *व्यवसायिक वस्तू* – मध्ये आटा चक्की,शिलाई मशीन, सोलर,वजन काटा,डीप फ्रीज,ए. सी. या वस्तूंचा समावेश करण्यात आला असून या करिता कर्ज योजना संस्थेने उपलब्ध करून दिली आहे.सदर वस्तूवर कर्ज मान्यताप्राप्त प्राप्त विक्रेते कडून देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सरव्यवस्थापक श्री .मोरे यांनी दिली. तसेच संस्थेच्या वतीने ग्राहकांच्या ठेवींवर तसेच कर्जावर नव्याने बदल करून आकर्षक व सुलभ व्याजदर सुद्धा देण्यात येणार असून त्याचा फायदा निश्चितच ग्राहकांना होणार असल्याचे संस्थेचे चेअरमन नासिर काझी यांनी सांगितले. प पु भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंथा मर्यादित खारेपाटण यांच्यावतीने ग्राहकांना विविध कर्ज योजना जाहीर करण्यात आल्या असून त्याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
प.पु. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे विविध कर्ज योजनेचा शुभारंभ
