कंगना राणावतवर पासांतर्गत गुन्हा दाखल करा

काँग्रेसची मागणी, पोलिसाना दिले निवेदन

*⚡सावंतवाडी ता.१३-:* भारत देशाला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. देशाला खऱ्या अर्थाने २०१४ सालीच स्वातंत्र्य मिळाले, असे आक्षेपार्ह विधान करून अभिनेत्री कंगना राणावत हिने समस्त स्वातंत्र्य सैनिकांचे चारित्र्यहनन केले असून यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच या विधानामुळे देशातील सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंगना राणावत हिच्यावर पासा १९८५ कायद्यान्वये गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस तालुका कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षकांना दिले आहे.

यावेळी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, शहर अध्यक्ष अँड राघवेंद्र नार्वेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

You cannot copy content of this page