राष्ट्रवादीच्या अफरोज राजगुरू यांनी घेतली सेनेच्या अप्पा पराडकर यांची भेट

निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भेटीला आलेय महत्व

*⚡सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडीच्या माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादीच्या नेत्या अफरोज राजगुरू यांनी मुंबई येथे जाऊन शिवसेनेचे कामगार नेते अप्पा पराडकर यांची सदिच्छा भेट घेतली आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय वर्तुळात चर्चचा विषय ठरत आहे. अफरोज राजगुरू या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय नेत्या असून, सावंतवाडीच्या माजी नगरसेविका आहेत. मात्र त्यांनी अचानक काल मुंबई येथे जाऊन शिवसेनेचे कामगार नेते अप्पा पराडकर यांची भेट घेतली आहे. परंतु, ही भेट का घेतली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय वर्तुळात चर्चचा विषय ठरत असून, राजकीय खलबते सुरू झाली असल्याचे चित्र दिसत आहे.

You cannot copy content of this page