*प्रा.रुपेश पाटील यांच्या शोध निबंधाची निवड आंतरराष्ट्रीय संशोधन ग्रंथात-

*⚡सावंतवाडी ता.१२-:* आजगाव येथील प्रा.रुपेश पाटील यांनी लिहिलेल्या ‘वर्तमानातील संत साहित्याची उपयोग्यता’ या शोधनिबंधाची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोध ग्रंथात झाली आहे. विश्व हिंदी संघठन, नवी दिल्ली यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणाऱ्या ‘शोध ऋतू’ या संशोधन ग्रंथात प्रा.पाटील यांनी लिहिलेल्या शोध ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. प्रा.रुपेश पाटील यांनी आपल्या शोध निबंधात संत साहित्याचा आजच्या काळात कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो, हे सोदाहरण स्पष्ट करून शोधनिबंध लिहिला आहे. यात प्रा.पाटील यांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत कबीर , आधुनिक संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा आढावा घेत तत्कालीन संदर्भातून आजच्या काळातील उपयोग्यता स्पष्ट केली आहे. ‘शोध ऋतू’ या आंतरराष्ट्रीय शोध ग्रंथात प्रा.पाटील यांच्या शोधनिबंधाचा समावेश करण्यात आला आहे. प्रा. रुपेश पाटील यांचे या आधीही विविध राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. प्रा. पाटील यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page