एसटी कर्मचारी आंदोलनावरून केली टीका
*⚡कुडाळ ता.०९-:* तुम्हाला ४३ डिग्री तापमानात किमान एक तास गरम पत्र्यावर बसा म्हटले तर बसाल काय ? बसचा ड्रायव्हर कंडाक्टर आठ आठ तास बसत असतो. कडक उन्हाळा आणि समोर तापलेले बसचे भले मोठे इंजिन. बसायची खूर्चीही निट नाही ती सुद्दा पत्र्याचीच. गर्मीने तापलेली.तुम्हाला मुसळधार पावसात किमान एक तास आंगावर पावसाच्या धारा घ्या म्हटले तर घ्याल काय? असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन सेनेचे राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी उपस्थित केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले, एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा जाहीर पाठिंबा असून संप मिटेपर्यंत त्यांच्या सोबत राहणार, अशी आश्वासन देत एस. टी. कर्मचाभ्यऱ्यांच्या समस्यांचा पाढाच वाचला. खेड्यापाड्यात नेवून लावेल्ल्या बसमध्ये ड्रायव्हर कंडाक्टर गळक्या बसमध्ये आंगावर पावसाच्या धारा घेत रात्र रात्र काढत असतात. थंडीच्या काळातही हेच जीने. बरे या बदल्यात त्यांना मिळते काय ?? महिन्याला साडे नऊ हजार रुपये पगार . फारतार २० हजारापर्यंत पगारवाढ. स्वताच्या जिवाच्या हालअपेष्टा करुन , खड्ड्यांच्या राज्यात हलत्या बसमधे हे लोक आपले जीवन व्यतीत करतात. त्यांना सहानुभूती तर सोडाच वरुन मध्यमवर्गीय माजोरड्या नोकरदारांची बोलणी खावी लागतात . मागे प्राध्यापकांची पगारवढ एकही आंदोलन न करता सरकारने केली. दिड ते दोन लाख रुपये महिना पगार घणारे ऐशारामी प्राध्यापक आणि दिवसरात्र राबणारे हे ड्रायव्हर-कंडक्टर, सरकारला ही तफावत दिसत नाही का ? सरकारकडे पैसे नव्हते तर प्राध्यापकांची पगारवाढ कशी झाली. आणि सरकारच्या तिजोरीत या ड्रायव्हर कंडक्टरसाठी पैसे नाहीत का ? वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारी सेवा सुविधा जास्त कशा काय ? त्यांनी किती पिढ्या दहा हजार रु. महिन्याच्या पगारीवर काम करायचे ? हास्यास्पद तर हे आहे की, २०१७ साली बोनस म्हणून बस कर्मचाऱ्यांना अडीच हजार रु. देण्यात आले होते. काय येते हो या अडीच हजार रुपयात एक ग्यास भरुन येतो आणि एक नवाकोरा जी.एस.टी लागलेला ड्रेस येतो. म्हणजे पेटवून घेण्यासाठी मढ्यावर अडीच हजार रुपये सरकारने घातले आहेत सेच ना ??
