देवबाग ग्रामपंचायत सरपंच सौ. जान्हवी खोबरेकर यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार*
*💫मालवण दि.२३-:* आठवड्याभरापूर्वी देवबागच्या समुद्रात बुडणाऱ्या राधानगरी येथील संदेश म्हापसेकर आणि सुदेश पाटील या दोघा पर्यटकांना वाचविणाऱ्या जयेश शिवराम मुंबरकर, सीमाव फिलिप फर्नांडिस व सॅल्डन आष्टी फर्नांडिस या स्थानिक तरुणांचा देवबाग ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. जान्हवी खोबरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दि. १६ डिसेंबर रोजी देवबाग शिवलकरवाडी येथील समुद्रात राधानगरी येथील संदेश म्हापसेकर आणि सुदेश पाटील हे दोन पर्यटक समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी समुद्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोन्ही पर्यटक पाण्यात बुडू लागले ही घटना समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या जयेश मुंबरकर, सीमाव फर्नांडिस व सॅल्डन फर्नांडिस या तिघांनी धाव घेत पर्यटकांना समुद्राबाहेर काढून वाचविले होते. पर्यटकांना जीवदान देणाऱ्या या तिघांचा देवबाग ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. जान्हवी खोबरेकर, सदस्य नादार तुळसकर, ग्रामसेवक युवराज चव्हाण व ग्रा. प. कर्मचारी उपस्थित होते.
