दागिन्यांसह सुमारे १लाख ९२ हजाराचा मुद्देमाल चोरीस*
कुडाळ ः माणगांव मळावाडी येथील सौ. अनुराधा गोपिनाथ खरवडे यांच्या घरातील दागिने व रोख रकमेसह सुमारे 1 लाख 92 हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला . पुतण्याच्या हळदिच्या कार्यक्रमाला सौ अनुराधा खरवडे ही महिला गेली असताना घरात कोणीच नसल्याची संधी साधत चोरट्याने ही चोरी केली. या महिलेने घराच्या अंगणात कौलाखाली लपवुन ठेवलेली चावी शोधुन काढत या चोरट्यांनी ही चोरी केली ही घटना दि. 22 डिसेंबर रोजी रात्री 12.30 पुर्वी घडली. सौ अनुराधा खरवडे याच्या पुतण्याचे दि. 23 डिसेंबर रोजी लग्न होते. यामध्ये दि. 21 डिसेंबर रोजी गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला त्यांची सुन सौ. सिध्दी हीचे मंगळपुत्र या महिलेने घातले होते. यानंतर हे मंगळपुत्र त्यांनी आपल्याच कपाटात ठेवले होते. 22 डिसेंबर रोजी माणगांव मळावाडी येथे पुतण्याचा हळदीचा कार्यक्रम असल्याने त्यासाठी त्या सांयकाळी 7 वाजता गेल्या होत्या. हळद कार्यक्रम आटपुन रात्री 12.30 वाजता घरी आल्या होत्या. या दरम्यान घराच्या मुख्य दरवाजाची व कपाटाची चावी अंगणातील ठेवलेल्या कौलांच्या खाली लपवून ठेवली होती. यानंतर दि. 23 डिसेंबर रोजी पुतण्याचे लग्न असल्याने कपाटात ठेवलेले मंगळसुत्र घालण्यासाठी कपाट उघडल्यावर ठेवलेल्या ठिकाणी मंगळसुत्र दिसले नाही. व याच ठिकाणची 5 हजार रू.रोख रक्कमही गायब झाली होती. मात्र तिने सुन सौ. सिध्दी हीच्या कपाटातील दागिने पाहिल्यावर ते सुरक्षित असल्याचे आढळले. यानंतर देवखोली मध्ये पर्स मध्ये ठेवलेले सोन्याचे कुडेही गायब झाल्याचे लक्षात आले. सुमारे साडेतीन तोळे वजनाचे मंगळसुत्र, अडिज ग्रम वजनाचे कुडे व पाच हजार रूपये रोख रक्कम असा 1 लाख 92 हजारचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून गेला. ही महिला हळदीच्या कार्यक्रमाला गेली असताना घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने हे कृत्य केले. तसेच या महिलेने अंगणात कौलाखाली ठेवलेली चावी चोरट्याने अचुक शोधुन काढत ही चोरी केली.
