दिवाळीचा एक दिवा शिवरायांच्या चरणी उपक्रमाला प्रतिसाद
*⚡कणकवली ता.०७-:* महाराष्ट्रातील आणि देशातील ऐतिहासिक दुर्लक्षित गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन होण्याच्या दृष्टीने तसेच शासनाच्या पुरातत्व खात्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी खारेपाटण येथील प्राचीन शिवकालीन दुर्गादेवी मंदिर आणि किल्ले खारेपाटण दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर किल्ले खारेपाटण येथे ‘दिवाळीचा एक दिवा शिवरायांच्या चरणी’ हा उपक्रम मावळे आम्ही स्वराज्याचे आणि शिवजयंती उसत्व समिती खारेपाटण यांच्यावतीने सयूंक्त रित्या नुकताच राबविण्यात आला. यावेळी ‘मावळे आम्ही स्वराज्याचे’ या रजिस्टर संस्थेचे उपजिल्हाप्रमुख अनिकेत तर्फे, विशाल माने, राजेश पवार इत्यादींसह 25 मावळे व शिवकन्या उपस्थित होत्या.सायं.4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत श्रमदानातून किल्ल्याची व आजूबाजूच्या परिसराची साफसफाई व स्वछता केली. त्यानंतर किल्ल्याच्या मुख्य व सुस्थितीत असलेल्या काळेत्री दगडाच्या बुरुजाला झेंडूच्या फुलांचे तोरण लावण्यात आले, आणि अंधार पडल्यावर तिन्हीसांजेला किल्ल्यावर, बुरूजावर, तटबंदीवर, किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरात व परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने खारेपाटण मधील शिवप्रेमी उपस्थित होते.यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ” खारेपाटण किल्ले येथील कार्यक्रमाबाबत फक्त सोशल मिडियावर व व्हाट्सअप ग्रुप वर फक्त एक साधा आवाहनाचा मेसेज टाकला. मेसेज टाकताना वाटलेलं की, किमान 50 ते 100 दिवे लावूया, मात्र नागरिकांचा या उपक्रमाला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की, सायंकाळी जवळपास 1000 पेक्षाअधिक दिवे किल्ले खारेपाटण येथे लावले गेले. “असल्याची माहिती खारेपाटण येथील शिवप्रेमी व कर्यक्रमाचे आयोजक श्री ऋषिकेश जाधव यांनी दिली. या कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी खारेपाटण मधील शिवजयंती उत्सव समितीने खूप मेहनत घेतली. यामध्ये सर्वश्री मंगेश गुरव, महेश कोळसुलकर, संकेत शेट्ये, ऋषिकेश जाधव, बबन तेली, संजय कोळसुलकर, बाळा कांबळी, प्रज्योत मोहिरे, भूषण कोळसुलकर, कुमार बाबरदेसाई इत्यादींसह सौ.अंजली कुबल, साधना धुमाळे, रिया जाधव, प्रमिला शेट्ये, अमृता ब्रम्हदंडे, गौरी शिंदे, निधी शिंदे, सिद्धी शिंदे, अर्चना झगडे, पूजा निग्रे, प्राप्ती कट्टी, कीर्ती शेट्ये, समीक्षा शेट्ये, मयुरी पाटील, प्राची कांबळी, पौर्णिमा कांबळी, चित्रा कोळसुलकर, पूर्वा इसवलकर इत्यादींसह अनेक खारेपाटणकर स्त्री-पुरुष व बाल ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावर्षी प्रथमच हा कार्यक्रम घेतल्यामुळे खारेपाटण किल्याची व परिसराची संपूर्ण स्वछता करण्यात आली.व संपूर्ण परिसर दिव्याच्या प्रकाशाने तेजोमय झाला होता.त्यामुळे कार्यक्रम संपल्यावर बऱ्याच जणांनी ‘ दरवर्षी असा दीपोत्सव साजरा करण्यात यावा .अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
