*२६ आणि २७ डिसेंबर रोजी आयोजन : जास्तीत जास्त दुर्ग सेवकांनी सहभागी व्हावे
*💫सावंतवाडी दि.२३-:* छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीवार्दाने सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र सिंधुदुर्ग विभाग आणि समस्त फुकेरी ग्रामस्थांवतीने हनुमंत गड संवर्धन मोहीम २६ आणि २७ डिसेंबर रोजी राबविण्यात येत आहे. मोहिमेत जास्तीत जास्त दुर्ग सेवकांनी सहभागी होऊन ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. २६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता स्वतःच्या वाहनाने गडाच्या पायथ्याशी जमणे, त्यानंतर १०.३० वाजता मोहीम प्रमुख सुनिल दादा, सिंधु दादा यांच्या मार्गदर्शनाखाली गड चढण्यास सुरुवात होणार आहे. गड चडून झाल्यावर दुपारी १ वाजता स्वच्छता मोहिमेस सुरुवात होणार आहे, असे या मोहिमेचे स्वरूप आहे. दुर्ग संवर्धन असल्यामुळे एक जोडी जादा कपडे, थंडीचे दिवस असल्यामुळे स्वेटर, मफलर, चादर (बॅनर-गोधडी) सोबत ठेवावे. स्लीपिंग बॅग/मॅट, २ लीटर पाण्याची कॅन, सुका खाऊ, औषधे चालू असल्यास सोबत आणावी. तसेच ग्लुकोन-डी, इलेक्ट्रोल-पावडर, डायरी आणि पेन तसेच बॅटरी टॉर्च प्रत्येकास बंधनकारक आहे. दोन जादा सेल मोबाईल पावर बँक सोबत असावी, दुर्ग सेवकाने येताना घरातून एक ग्लास तांदूळ, एक वाटी डाळ, दोन कांदे, बटाटे टोमॅटो आणावयाचे आहेत. तसेच जंगलात चालताना ट्रेक पेन्ट फुल हाताची टिशर्ट आणि चांगले ग्रिप असलेले शुज आवश्यक आहेत. तसेच कोणतीही मौल्यवान वस्तू सोबत आणू नये, स्वतः च्या सामानाची जबाबदारी स्वतःच घ्यावी व परफ्युमचा वापर कोणीही करू नये, अशी नियमावली ठेवली आहे ऐतिहासिक हनुमंतगडाचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या गड संवर्धन मोहिमेत जास्तीत जास्त दुर्ग सेवकांनी सहभागी व्हावे. यासाठी दोडामार्ग तालुक्यांतील फुकेरी गावात सर्वांनी उपस्थित रहावे. इच्छुक दुर्गसेवकानी नावनोंदणीसाठी सुनील राऊळ-९६३७८२६३१५, सिद्धेश परब-९४०४७४०८२२, रितेश राऊळ-८७८८८७६१७३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
