जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे विधान…
*⚡बांदा ता.३०-:* महाराष्ट्र वगळता इतर कोणत्याही राज्यात कोणत्याच नेत्या मागे इडीच्या चौकश्या लावल्या जात नसून, महाराष्टातील सरकार कसे पाडता येईल याकडे भाजपचे लक्ष असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, भाजपने कितीही प्रयत्न केले तरीही हे सरकार ५ वर्ष टिकणार असून, भाजपला विरोधी बाकावरच बसावे लागणार आहे.
