त्या” खाण कंपनीवर जप्तीची कारवाई करा…

आमदार दीपक केसरकर यांचे दूरध्वनीवरून खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांना आदेश

*⚡दोडामार्ग ता.३०सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील मोठ्या बाजारपेठा असलेल्या साटेली भेडशी पर्यायी बायपास रस्ता तयार करण्यासाठी नियोजन करावे अशा सुचना माजी पालकमंत्री विद्यमान आमदार यांनी आढावा बैठकीत देवुन कळणे खाण फुटुन तीन महिने झाले तरी शेतकरी बांधव यांना नुकसानभरपाई दिली गेली नाही. जर कळणे खाण कंपनी रक्कम जमा करत नसेल तर खाण नियमानुसार संबंधित खंपनीवर जप्तीची कारवाई करावी अशा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांना दुरध्वनीवरुन देवुन या संदर्भात आपण जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितले. दोडामार्ग तालुका दक्षता समिती पुरवठा शाखेची आढावा बैठक शनिवारी सकाळी दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे आमदार दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली यावेळी तहसीलदार अरुण खानोलकर, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव ,नायब तहसीलदार देसाई,पोलीस निरीक्षक आर.जी नदाफ,बांधकाम विभाग विजय चव्हाण,तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी,समिती सदस्य तसेच जिल्हापरिषद सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page