*⚡कणकवली ता.३०-:* राज्याचे जलसंपदामंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कुडाळ-मालवणचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबीद नाईक यांच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी भेट दिली. या भेटीप्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी अबीद नाईक यांच्या निवासस्थानी जयंत पाटील यांची भेट घेतली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार शेखर निकम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक, काका कुडाळकर, सुभाष उर्फ बाबू सावंत आदी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचे आम. वैभव नाईक यांनी केले स्वागत
