आठ दिवसांत दांडेली गावात रूग्णवाहिका आणणार

अमोल आरोसकर, संदीप माणगावकर : निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करणार

*⚡बांदा ता.३०-:* दांडेली गावातील रुग्णांना योग्य आरोग्य विषयक सुविधा व वेळेवर उपचार मिळावे यासाठी भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या सौजन्याने येत्या आठ दिवसांत रूग्णवाहिका उपलब्ध करणार असल्याची माहिती, भाजपा युवा कार्यकर्ते अमोल आरोसकर व संदीप माणगावकर यांनी दिली. दांडेली ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान जनतेला रुग्णवाहिकेसंदर्भात दिलेला शब्द आपण येत्या आठ दिवसांत पूर्ण करणार आहे. रुग्णांची रूग्णवाहिकाविना होणारी हेळसांड थांबण्यासाठी रसिक दळवी यांच्यासह ग्रामस्थांनी सदर मागणी लावून धरली होती. याची दखल घेत अमोल आरोसकर व संदीप माणगावकर यांनी आरोग्य विभागास बळकटी मिळावी पर्यायाने दांडेली गावासाठी रूग्णवाहिका उपलब्ध व्हावी म्हणून भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट घेत ग्रामीण भागातील व्यथा मांडली. आमदार शेलार यांनी तात्काळ दांडेली गावासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देतो असे आश्वासन दिल्याचे अमोल आरोसकर यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात दांडेली गावातील रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. दरम्यान, अमोल आरोसकर म्हणाले की निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेला शब्द आम्ही खरा करणार असल्याचे सांगितले. केवळ दिशाभूल करून फसवी आश्वासने देणे आमच्या रक्तात नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

You cannot copy content of this page