आरोस तंटामुक्त समिती अध्यक्षपदी राजन नाईक

*⚡बांदा ता.३०-:* सरपंच शंकर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत आरोस गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राजन नाईक यांची निवड करण्यात आली. राजन नाईक यांचा गावाशी असलेला सलोखा व वागणूक लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या मतानुसार राजन नाईक यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी निवड केल्याचे सरपंच शंकर नाईक यांनी सांगितले. यावेळी पोलीस पाटील महेश आरोसकर, ग्रामसेवक तसेच संतोष जाधव, प्रसाद नाईक, प्रणेश नाईक, सतीश नाईक, राजन नाईक, सुरेश नाईक, मोहिनी नाईक, गुरु आरोसकर, मोहन नाईक, तुकाराम नाईक उपस्थित होते. दरम्यान, राजन नाईक म्हणाले की गावातील तंटे सोडविताना कोणताही मतभेद होणार नाही. प्रत्येक व्यक्तीला समितीच्या निर्णयानुसार योग्य न्याय देत गाव तंटामुक्त करण्याचा आपला मानस असल्याचे राजन नाईक यांनी सांगितले.

You cannot copy content of this page