चौके येथे अपघातात बेळगाव खानपूर येथील युवकाचा जागीच मृत्यू

मालवण दि -प्रतिनिधी – मालवण येथून शुक्रवारी सकाळी चौके नेरुरपार मार्गे बेळगाव-खानापूर येथे स्प्लेडंर मोटरसायकल KA- 22- HD-4060 ने जाणाऱ्या युवकाने चौके नारायणवाडी पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या वळणावर कुडाळहून मालवण च्या दिशेने येणाऱ्या मासे वहातूक करणाऱ्या बोलेरो पिक अप ला ड्रायव्हर साईला जोरदार धडक दिली.डांबरी रस्त्यावर पडून डोक्याला जोरदार मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.. मालवण येथे गवडींकामा निमीत्त असणारा अशोक धुळू जंगले(२३) मुळ रा.बेळगांव-खानापूर हा युवक शुक्रवारी सकाळी मालवण वरुन स्प्लेंडर मोटरसायकलने चौके नेरुरपार मार्गे बेळगांव येथे जात आसताना सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चौके नारायणवाडी पेट्रोल पंपानजीक च्या वळणावर कुडाळवरुन मालवण ला मासेवहातूक करणाऱ्या चालक संदिप देसाई यांच्या ताब्यातील बोलोरो पिक अप MH 07-AJ 2247 ला चालकाच्या बाजूने मागील बाँडीला जोरदार धडक दिली.रस्त्यावर पडून डोक्यात हेल्मेट असूनही जोरदार मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर मिळताच चौके येथील व्यावसाईक संतोष गावडे,बी.जी.गावडे.संजय गावडे,हेमंत गावडे,शिवाजी गावडे,अमित चव्हाण ,अजीत गावडे,यानी अपघात स्थळी धाव घेतली.यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजुला जवळपास एकतास वहातुक खोळंबली होती.मालवण पोलिस ठाणेचे सहा.पो.निरीक्षक नितीन नरळे.पोलिस.काँ.डी.व्ही.जानकर,एच व्ही पेडाणेकर,व्ही एच पाटिल यांनी पंचनामा करुन अधिक तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी चौके आरोग्य केंद्रात नेण्यात आला..

You cannot copy content of this page