समीर वंजारींसह उभाबाजार मित्रमंडळींनी दिल्याशुभेच्छा
*⚡सावंतवाडी ता.२९-:* गुरुनाथ वासुदेव पोकळे यांच्या कुडाळ येधील म्युझिकल हाऊस शाखा-२ चे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. सावंतवाडीमध्ये गुरुनाथ पोकळे यांच्या म्युझिकल हाऊसचा ५० वर्ष व्यवसाय सुरू आहे. लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपली दुसरी शाखा कुडाळ येथे सुरू केली आहे या उद्घाटनप्रसंगी शेखर पोकळे आणि कुटुंबीयांना सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी, पनवेलकर ज्वेलर्सचे मालक राजेश पनवेलकर, महेश ऊर्फ आबा केसरकर, श्याम पडते, सचिन मळीक व उभाबाजार येथील सर्व मित्रमंडळी यांनी प्रत्यक्ष कुडाळला जाऊन शुभेच्छा दिल्या. सर्वांचे आभार मानले .