दफन भूमीच्या संरक्षण भितीसाठी मागितला निधी…
सावंतवाडी : केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपयुमो जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी भेट घेतली. बांदा मुस्लीमवाडी येथील दफनभूमी संरक्षक भिंतीसाठी निधी मिळावा अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपयुमो जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी राणेंकडे केली. दरम्यान, या संरक्षक भिंतीसाठी निधी देणार असल्याचा शब्द नारायण राणेंनी दिला आहे.