कुडाळ नगरपंचायतीकडे लवकरच हक्काची अग्निशमन यंत्रणा

आ. वैभव नाईक;मिनी फायर फायटर पुरविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान

*⚡कुडाळ ता.२८-:* पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा वार्षिक योजना अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योनजेअंतर्गत कुडाळ नगरपंचायतीस मिनी फायर फायटर मंजूर करून घेतला आहे. याकामासाठी ५४ लाख ८१ हजार रु च्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कुडाळ नगरपंचायतीसाठी अग्निशमन सेवा पुरविण्याची मागणी शिवसेना पदाधिकारी तसेच व्यापारी संघटना व नागरिकांनी केली होती. हि मागणी तातडीने पूर्ण करण्यात येत असून लवकरच मिनी फायर फायटर पुरविण्यात येणार आहे.यासाठीचा निधी प्राप्त झाला असून येत्या महिन्याभरात कुडाळ नगरपंचायतीकडे हक्काची अग्निशमन यंत्रणा असेल. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page