मसुरेच्या आशिष प्रभुगांवकर यांची सचिवपदी निवड

भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार संघटनेने घेतली दखल

मालवण दि प्रतिनिधी भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार संघटना (आय एन एम डब्ल्यू यु) च्या राष्ट्रीय सचिव पदी मसुरे गावचे सुपुत्र आशिष विजयसिंह प्रभुगावकर यांची निवड करण्यात आलेली आहे. आशिष प्रभुगावकर यांची सामाजिक संघटनात्मक उपक्रमा मधील विस्तृत आणि वैविध्यपूर्ण अनुभवाचा विचार करून भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार युनियन च्या राष्ट्रीय राज्य आणि जिल्हास्तरीय युनिट्स मजबूत करण्यासाठी ही निवड करण्यात आल्याचे अमजद हसन राष्ट्रीय सरचिटणीस (आय एन एम डब्ल्य यू) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आशिष प्रभुगावकर हे माजी राज्यमंत्री कै. बापूसाहेब प्रभुगावकर यांचे सुपुत्र असून माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांचे बंधू आहेत या निवडीबद्दल आशिष प्रभुगावकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page