आंबा-काजू शेतकऱ्यांना जिल्हा बँकेचा दिलासा…

२% अतिरिक्त व्याज सवलत जाहीर:८२८० शेतकऱ्यांना सुमारे २ कोटींची मदत; पुढील हंगामासाठी कर्ज मर्यादा वाढवून ४० कोटींचा जादा कर्जपुरवठा तरतूद; मनीष दळवी..

वैभववाडी प्रतिनिधी
श्वेता सावंत
वैभववाडी तालुक्यातील नावळे गावचे ग्रामदैवत श्री भगवती देवी शिमगावत्सव निमित्त होळीच्या माडावर जि प विद्या मंदिर नावळे धनगरवाडा विद्या मंदिर नावळे नंबर 1 विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी गोप नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले उपस्थित रसिकांनी विद्यार्थ्यांच्या ह्या कलेला दात देत बक्षिसांची उधळण केली हे गोप नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम मुख्याध्यापक संतोष भरडकर सहशिक्षक जयकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केले ही एक पारंपरिक कला असून या कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास होतो गाण्याच्या तालावर सोळा विद्यार्थी गोल राहुन गोप विणतात तसेच ते सोडवतात प्रत्येक विद्यार्थी त्याच ठेक्यावर हे गोप विंतो व सोडवतो.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गावच्या सरपंच सोनाली गुरव उपसरपंच संजय रावराणे तंटामुक्ती अध्यक्ष संजय शेळके पोलीस पाटील स्नेहा शेळके माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गुरव माजी पोलीस पाटील विलास रावराणे माजी सरपंच संभाजी रावराणे, संजय पाटील राजाराम गुरव अंकुश घाडी रश्मी गुरव पल्लवी गुरव जगन्नाथ गुरव आधी गावातील ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page