फोंडाघाट हवेलीनगर येथील मयुरेश धाक्रस यांचे निधन…

⚡कणकवली ता.११-: फोंडाघाट हवेलीनगर येथील मयुरेश दिलीप धाक्रस (वय ३७) यांचे मंगळवारी सकाळी पुणे येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचे शालेय शिक्षण करुळ हायस्कूल येथे झाले असून पुढील शिक्षण त्यांनी रत्नागिरी आणि पुणे येथे पूर्ण केले होते. त्यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच मित्रपरिवार व नातेवाईकांनी बुधवारी सकाळी फोंडाघाट येथील त्यांच्या राहत्या घरी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार असून ते रा.प.म. कणकवली विभागातील निवृत्त वरिष्ठ लिपिक दिलीप धाक्रस यांचे एकुलते एक चिरंजीव होते. त्याच्यावर फोंडाघाट येथील स्मशान भूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

You cannot copy content of this page