खारेपाटण नगरवाचनालयात ग्रंथ प्रदर्शन

*⚡कणकवली ता.२८-:* कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील नगर वाचनालय खारेपाटणच्यावतीने वाचन प्रेरना दिनानिमित्त वाचनालयाच्या सभागृहात पुस्तके व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन नगर वाचनालयाचे जेष्ठ विश्वस्त अशोक नवरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या कार्यक्रमाला नगर वाचनालय खारेपाटणचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, संजय शेट्ये,वाचन प्रेमी विश्वजीत ढेकणे,ग्रंथपाल महेश सकपाळे, ग्रंथालयीन कर्मचारी सौ.रिया जाधव,प्रकाश लाड आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला संस्थेचे विश्वस्त अशोक नवरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना नगरवाचनालयाचे संचालक संतोष पाटणकर म्हणाले, ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचकांना एकत्रित आणून वाचन चळवळ अधिक वृद्धिंगत करणे काळाची गरज आहे.तसेच कोरोना महामारी नंतर देशातील सर्व मंदीरे अगोदर उघडण्यापेक्षा ज्ञान मंदिरे व वाचन मंदिरे शासनाने प्रधान्याने उघडून त्यांना तातडीने परवानगी देणे गरजेचे आहे.त्यामुळे देशातील सुज्ञान नागरीक घडवण्याची ताकत फक्त वाचनालयामध्ये आहे. “वाचाल तर वाचाल’ या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने मनुष्याचे कल्याण होऊ शकते.मात्र मोबाइल मुळे आजच्या पिढीचे वाचन संस्कृतीकडे पूर्णताह दुर्लक्ष झाले असून कठीण परिस्थिती मध्ये ही वाचनालयाच्या माध्यमातून वाचन चळवळ टिकून आहे.त्यामुळे येथील वाचक व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. असे प्रतिपादन संस्थेचे विश्वस्त अशोक नवरे यांनी मारवदर्शन करताना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संतोष पाटणकर यांनी केले. तर सर्वांचे आभार ग्रंथपाल महेश सकपाळे यांनी मानले.

You cannot copy content of this page